मोदी सरकारने केलेल्या इंधन दरकपातीचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “आता आपल्या देशाला…”

इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय घमासान सुरु असताना इंधनाच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना झटका देत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. हे दर रात्रीपासून लागू झाले आहेत. यानंतर इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय केरोसिनच्या किंमतीतही ३० रुपयांनी वाढ झाली असून दर १५५ रुपये ५६ पैसे झाला आहे.

हे वाचले का?  समुद्रातून डिझेल तस्करी करणारी टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इम्रान खान यांच्याकडून सरकारवर टीका करताना भारताचं कौतुक

पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढ झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे भारत सरकारचं कौतुक केलं आहे.

इम्रान खान यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन टीका करताना म्हटलं आहे की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ करत देशाने आयात केलेल्या सरकारच्या अधीनतेसाठी किंमत मोजायला सुरुवात केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ आहे. आपल्या अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून ३० टक्के स्वस्त तेलासाठी केलेल्या कराराचा पाठपुरावा केला नाही”.

हे वाचले का?  आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या अडचणी वाढल्या, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुढच्या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्याच्या धोरणाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की “याउलट अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत इंधनाच्या किंमती २५ रुपयांनी कमी केल्या आहेत. आता आपल्या देशाला बदमाशांच्या हातून महागाईचा आणखी एक मोठा डोस सहन करावा लागणार आहे”

अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती ३० ने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत चर्चा फिस्टकल्यानंतर ही इंधन दरवाढ करण्यात आली.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचं इस्माइल यांनी सांगितलं. नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असल्याचंही ते म्हणाले.