दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन तालिबानने केले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाची अनेक विमानेही नष्ट झाली आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर जगभरातील सर्व देश चिंता व्यक्त करत आहेत. त्याचवेळी युक्रेन संकटावर वक्तव्य करताना तालिबानने दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन तालिबानने केले आहे.
अफगाणिस्तानवर रक्तरंजित ताबा मिळणाऱ्या तालिबानने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तालिबानने दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि हिंसाचार आणखी भडकावणारी वृत्ती न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानने रशिया आणि युक्रेनला हे संकट सोडवण्यासाठी वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला.…”
या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे तालिबाने सांगितले. तालिबानने नागरिकांच्या जीवितहानीच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली आहे. तालिबानने संपूर्ण संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. जेव्हा तालिबानने काही महिन्यांपूर्वीच एका रक्तरंजित हल्ल्यानंतर स्वतःची सत्ता काबीज केली होती यानंतर हे विधान केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अफगाण सैनिक मारले गेले.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्याने सामरिक चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतल्यानंतर युक्रेनची शक्ती उद्ध्वस्त करण्याच्या अगदी जवळ आले होते आणि ते ९६ तासांच्या आत देश ताब्यात घेतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन म्हणाले की व्लादिमीर पुतिन यांनी कीवमधील युक्रेनियन सैन्याला वेढा घालण्याची आणि त्यांना एकतर आत्मसमर्पण करण्यास किंवा त्यांना नष्ट करण्यास भाग पाडण्याची योजना आखली आहे आणि युक्रेनचे नेतृत्व एका आठवड्यात कोसळू शकते, असे म्हटले आहे.