यॉर्कर किंग नटराजनचं भारतीय संघाकडून पदार्पण

IPL मध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं होतं.

तिसऱ्या एकदिवस सामन्यात तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नजराजन यानं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरु होण्यापूर्वी पदार्पणाची कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत केलं आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. टी नटराजन भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा २३२ वा खेळाडू ठरला आहे.

भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करताना नटराजन तामिळनाडूचा पाचवा गोलंदाज आहे. याआधी १९८२ मध्ये टी.ए. शेखर यांनी १९८२ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं होतं. भारतीय संघात स्थान मिळालेला शेखर तामिळनाडूचा पहिला गोलंदाज होता. त्यानंतर बी. अरुण (१९८६), टी कुमारन (१९९९), बालाजी (२००२) आणि नटराजन (२०२०) यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”