रत्नागिरी, रायगड जिल्ह्य़ातील शाळा आजपासून सुरू

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होत असून जिल्ह्य़ातील ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.

अर्थात अशा प्रकारे प्रत्यक्ष अध्यापन-अध्यनासाठी शासकीय शर्तीनुसार जिल्ह्य़ातील ९ ते १२ वीच्या फक्त २ हजार २८१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिली आहेत. पालकांची संमती मिळेल तशा शाळा सुरु कराव्यात, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे. शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी शिक्षकांना करोना चाचणी बंधनकारक आहे. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी ३, तर खेड तालुक्यातील १ शिक्षक करोनाबाधित आढळले आहेत.

रायगडमध्ये ५४५ शाळा सुरु

अलिबाग : रायगड जिल्ह्य़ात पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता  नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुमारे ५४५ शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला