शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे.
शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू. त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना (सुप्रिया सुळे) उद्योगतीचा दर्जा द्यायचा का, असे सत्तार म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“विरोधक आम्हाला खोके म्हणत आहेत. याच कारणामुळे त्यांची डोके तपासावी लागतील. ज्यांना खोक्यांची आठवण येत असेल त्यांच्यासाठी मी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांची डोके येथे तपासली जातील. हे भिकारचोट लोक आहेत. स्वत: भिकारचोट आहेत,” असे सत्तार म्हणाले.
“राजकारण हाच भिकारी धंदा आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतांचे भिक मागतात. मग मतांची भिक मागणारे ते भिकारी नाहियेत का? त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव एक उद्योगपती आहेत. मग त्यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?” असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.