राज्यातील महाविद्यालयेही बंद? आज निर्णय : सत्र परीक्षा ऑनलाइन

दीड वर्षांनंतर राज्यातील महाविद्यालये २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती.

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद करण्याबाबत कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मतैक्य झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर बुधवारी घोषणा केली जाईल. त्यामुळे सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

करोना रुग्ण वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना प्रसारानुसार, अन्य शहरांमधील शाळाही टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. महाविद्यालयेही बंद करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावी व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यावर सर्वाचे एकमत झाले. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केलेसुमारे दीड वर्षांनंतर राज्यातील महाविद्यालये २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. परंतु, रुग्णसंख्या वाढल्याने महाविद्यालये पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. सध्या तरी या महिनाअखेर महाविद्यालये बंद ठेवली जातील. रुग्णसंख्या लक्षात घेता पुढे निर्णय घेतला जाईल. सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यावरही बैठकीत चर्चा झाली.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

राज्यात मोठी रुग्णवाढ१८४६६ नवे बाधित

मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी वाढ नोंदविण्यात आली़  दिवसभरात करोनाचे १८,४६६ नवे रुग्ण आढळले, तर ७५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांपैकी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीत १५ हजार रुग्णांची भर पडली. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ६६, ३०८ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ६५३ झाली. गेल्या २४ तासांत मुंबईत १०,६०६, ठाणे शहर १३५४, कल्याण-डोंबिवली ४५७, उल्हासनगर ५३, मीरा भाईंदर ४५५, पालघर ७६, वसई-विरार ४५०,रायगड २१४, नाशिक ५१, नाशिक शहर २५७, पुणे १९८, पुणे शहर १११३, पिंपरी-चिंचवड ३३८, सातारा ८९ नवे रुग्ण आढळले.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

आज आढावा बैठक

पुणे : राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण राज्यभरासाठी एकच नियमावली असावी. त्यासाठी बुधवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देऊन त्यांच्या मान्यतेनंतर संपूर्ण राज्यासाठीचे नियम जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली.

जिल्हाधिकारीविभागीय आयुक्तकुलगुरू यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुलगुरूंनी त्यांच्या अडचणी मांडल्या. महाविद्यालये बंद करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. बुधवारी मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

– उदय सामंतउच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री