दिवसभरात ६ हजार ७३८ नवे करोनाबाधित वाढले, तर ९१ रुग्णांचा मृत्यू झाला
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज देखली राज्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात ८ हजार ४३० जणांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ८९.५३ टक्क्यांवर पोहचले आहे.
याचबरोबर आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४३० नवे करोनाबाधित आढळले असून, ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १६ लाख ६० हजार ७६६ वर पोहचली आहे. यामध्ये बरे झालेले १४ लाख ८६ हजार ९२६ जण, १ लाख २९ हजार ७४६ अॅक्टिव्ह केसेस व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २९ हजार ७४६ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ नमून्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमूने (१८.९४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीस राज्यात २५ लाख २८ हजार ५४४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर १२ हजार ९८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.