राज्यात आठवी ते बारावीच्या ३८.१८ टक्के शाळा सुरू

विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६७ टक्के

विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६७ टक्के

पुणे : राज्यात पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय कृती दलाच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला. मात्र आठवी ते बारावीच्या ३८.१८ टक्के  शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६७ टक्के  आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ६६.५३ टक्के  शाळा सुरू असल्याचे शिक्षण विभागाने संकलित के लेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

करोना संसर्ग कमी झाल्यावर शिक्षण विभागाने करोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास जुलैमध्ये मान्यता दिली. त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले.  पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य शासनाने नियुक्त के लेल्या तज्ज्ञांच्या कृती दलाने विरोध के ल्याने पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थगित करावा लागला. तर आठवी ते बारावीचे वर्ग गेला महिनाभर  ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

शिक्षण विभागाने संकलित के लेल्या माहितीनुसार राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि लातूर या विभागांमध्ये मिळून १७ हजार ७०१ (३८.१८ टक्के ) शाळा सुरू आहेत. तर १५ लाख १२ हजार विद्यार्थी (१४.६७ टक्के ) उपस्थित होते. प्रामुख्याने ग्रामीण भागांतील शाळा सुरू आहेत. तर लातूर, मुंबई, मुंबई महापालिका, रायगड, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील माहिती उपलब्ध नाही. नागपूर विभागात सर्वाधिक ६६.५३ टक्के  शाळा सुरू आहेत. त्या खालोखाल अमरावती विभागातील ६५.१३ टक्के ,लातूर विभागातील ६२.६७ टक्के , नाशिक विभागातील ४७.२२ टक्के  पुणे विभागातील १९.४५ टक्के , कोल्हापूर विभागातील १८.९८ टक्के , मुंबई विभागातील ६.७६ टक्के  शाळा सुरू आहेत.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

नांदेड जिल्ह्य़ातील ८९.२२ टक्के  शाळा सुरू

राज्यातील जिल्ह्य़ांमध्ये नांदेड जिल्ह्य़ातील सर्वाधिक ८९.२२ टक्के  शाळा सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर नंदूरबार जिल्ह्य़ातील ८७.६९ टक्के , भंडारा जिल्ह्य़ातील ८२.५८ टक्के  शाळा सुरू आहेत.