राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडेंचा राजीनामा; विजय वडेट्टीवारांचा संताप, म्हणाले “सरकराचं नेमकं…”

राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आधी तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट केली असून याबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवल्याचाही आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली.

ते पुढे म्हणाले, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं असं चाललंय काय? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहेत, याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, असंही ते म्हणाले.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतानाच निरगुडे यांनी ही वेळ निवडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजीनामा देताना निरगुडे यांनी देखील विविध आरोप केल्याचे समोर येत आहे. निरगुडे यांचा राजीनामा ओबीसी मंत्रालयाचे अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी स्वीकारला आहे.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट