राज्य ‘सेट’चा निकाल केवळ साडेसहा टक्के, मुलांनी टाकले मुलींना मागे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र सेट ही प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

वर्धा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र सेट ही प्राध्यापक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहे.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

एकूण १ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५१ हजार ५१२ मुलं तर ६८ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली. त्यापैकी अनुक्रमे ४३ हजार ५१७ व ५७ हजार ७२३ मुलामुलींनी परीक्षा दिली. मुलांचे पात्र ठरण्याचे प्रमाण ८. २० टक्के तर मुलींचे प्रमाण ५. ३८ टक्के आहे. सेटमध्ये मुली मागे पाडल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर… लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा कधी सुरू होणार?

तसेच १७ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात दोन पात्र ठरले. तर ३७२ दिव्यांग व ६८ अनाथ विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे ३३७ व ६० विद्यार्थ्यांना यश आले. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली. सेटच्या लिंकवर सविस्तर निकाल उपलब्ध आहे.