राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला
उद्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले
पंढरपूर : लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुख्मिणीचे मंदिर ७ तारखेला उघडणार असून संकेतस्थळावर नोंद करत रोज दहा हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. येणाऱ्या भाविकांना करोनाच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी समितीने घेतली असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.https://8563a205cb84fd742efa58a38f87f1c2.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html
राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. या पाश्र्वाभूमीवर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठक समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत मंदिर प्रवेशाबाबतच्या नियमावलीवर चर्चा झाली. यामध्ये करोनाबाबतचे सर्व नियमाचे पालन करतच प्रवेश देण्याचे सांगण्यात आले. तसेच दहा वर्षांच्या खालील आणि ६५ वर्षांपुढील नागरिक, गर्भवतींनी दर्शनास येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तापमान तपासले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांना मुखपट्टी, योग्य अंतर, सॅनिटायझर आदी नियम बंधनकारक आहे. मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून या दर्शनासाठी संकेतस्थळावरून तारीख, वेळ निश्चिात करता येईल. रोज या पद्धतीने दहा हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी येताना हार, फुले, नारळ, प्रसाद घेऊन येण्यास बंदी केली आहे. मंदिर, दर्शन रांग वेळोवेळी फवारणी आणि स्वच्छ केली जाणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे.