लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा नाशिकमध्ये मूक मोर्चा

लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत असल्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.दिल्लीच नव्हे तर, राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत असल्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

या पार्श्वभूमीवर, वरद लक्ष्मी लॉन्स येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने व्यापक बैठक झाली. त्यात बी. डी. भालेकर मैदानावरून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षांवर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागण्या करण्यात आल्या.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश