लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळताना मोदींकडून नियमभंग? लोक म्हणतात, “शिस्त- शिक्षणाचा..”

Lalkrishna Advani Bharatratna Award: राष्ट्रपती उभ्या असताना बसून राहणे हा प्रोटोकॉलचा भंग आहे, हे बेशिस्त वर्तन आहे, शिस्त व शिक्षण नसल्याचे उदाहरण आहे असं म्हणत हा फोटो अनेकांनी शेअर केला होता. पण यामध्ये..

Lalkrishna Advani Bharat Ratna Award: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. समारंभानंतर लाइटहाऊस जर्नलिझमला एक फोटो व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या तर लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले दिसले होते. राष्ट्रपती उभ्या असताना बसून राहणे हा प्रोटोकॉलचा भंग आहे, हे बेशिस्त वर्तन आहे, शिस्त व शिक्षण नसल्याचे उदाहरण आहे असं म्हणत हा फोटो अनेकांनी शेअर केला होता. पण यामध्ये नेमकं तथ्य किती आहे हे पाहूया..

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

तपास:

आम्ही आमच्या तपासाला गूगल कीवर्ड सर्चद्वारे सुरुवात केली आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याच्या अनेक बातम्या आम्हाला आढळल्या.

इथे पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये राष्ट्रपती भारतरत्न दिल्यानंतर बसलेल्या दिसत होत्या.

आम्हाला द हिंदूच्या वेबसाईटवर एक बातमी सापडली, ज्यात म्हटले आहे: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रोटोकॉलचे पालन करत होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माजी प्रेस सचिव अशोक मलिक यांनी X वर सांगितले की, राष्ट्रपती भवन प्रोटोकॉलमध्ये राष्ट्रपती आणि पुरकर प्राप्तकर्ता दोघेही उभे आहेत, तर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह इतर पाहुणे बसलेले आहेत. “प्राप्तकर्ता वृद्ध किंवा अस्वस्थ असल्यास तो/ती बसून राहू शकतो. हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात झाला नाही, मात्र तरीही नेहमीचा प्रोटोकॉल पाळला गेला होता,” तो म्हणाला.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

आम्हाला नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील सापडला ज्यामध्ये पंतप्रधान मोदींसह इतर लोक बसलेले दिसत होते.

निष्कर्ष: राष्ट्रपती मुर्मू उभ्या असताना पंतप्रधान बसून राहिल्याने प्रोटोकॉल भंग जाळायचा दावा दिशाभूल करणारा आहे. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न प्रदान केल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा बसल्या होत्या