नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयितास मुद्देमालासह पकडण्यात आले.
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयितास मुद्देमालासह पकडण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लाखांच्या मद्यसाठ्यासह एकूण १४ लाख, ६९ हजार, ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिंडोरी पोलीस गस्त घालत असतांना दिंडोरी-पेठ रोडवरील आशेवाडी शिवारात संशयित वाहनावर छापा टाकण्यात आला. छाप्यात विशाल आंधळे (३३, रा.मोरवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील विदेशी मद्याचा चार लाख, ६९ हजार, ७२० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.