विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईच्या संघनिवडीसाठी अंकोला यांचे साकडे

मुश्ताक अली क्रिकेट स्पध्रेत सलग चार सामन्यांत पराभूत झाल्यामुळे मुंबईचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेप्रमाणे मुंबईची कामगिरी खराब होऊ नये, याकरिता विजय हजारे करंडक स्पध्रेसाठी संभाव्य संघाची निवड लवकर करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती निवड समितीचे प्रमुख सलिल अंकोला यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे (एमसीए) केली आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

मुश्ताक अली क्रिकेट स्पध्रेत सलग चार सामन्यांत पराभूत झाल्यामुळे मुंबईचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मुंबईला एकमेव सामन्यात विजय मिळवता आला. ‘‘मुंबईचे प्रशिक्षक अमित पागनीस यांनी २० जानेवारीलाच पदाचा राजीनामा सादर केला आहे. हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी फेब्रुवारीच्या मध्यावर स्पध्रेला प्रारंभ होईल, असा अंदाज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्तवला आहे. त्यामुळेच संभाव्य संघाची निवड करण्यासाठी मी परवानगी मागितली आहे,’’ असे अंकोलाने सांगितले.

हे वाचले का?  Olympics 2024 : भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

येत्या आठवडय़ात ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेची बैठक होणार असून, यात याबाबत चर्चा होईल, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.