विजेची मागणी वाढली, कोळशाच्या साठ्यात घट!

महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा साठा कमी होत आहे. विशेष म्हणजे, खाणीत पाणी असल्याने कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची चिंता वाढली आहे.

नागपूर : पावसाळ्यात विजेची मागणी वाढल्याने महानिर्मितीला जास्त वीजनिर्मिती करावी लागली. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा साठा कमी होत आहे. विशेष म्हणजे, खाणीत पाणी असल्याने कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची चिंता वाढली आहे.

राज्यातून पाऊस परतताच अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे वातानुकूलित यंत्र, कृषीपंप, पंखे, विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने मंगळवारी (१० ऑक्टोबर २०२३) दुपारी ३.२० वाजता राज्यात विजेची मागणी २८ हजार २९७ मेगावाॅटवर पोहचली. तर यंदा पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी नेहमीच्या तुलनेत जास्त असल्याने महानिर्मितीला प्रत्येक वर्षीच्या तुलनेत जास्त वीजनिर्मिती करावी लागली.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

वीजनिर्मिती वाढवली गेल्याने कोळशाचा वापरही वाढल्याने महानिर्मितीच्या केंद्रामधील कोळशाचा साठाही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. १८ सप्टेंबर २०२३ रोजी महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा ६.५० लाख मेट्रिक टन होता. तर कोल वाॅशरीजकडेही मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक असल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. हा साठा ९ ऑक्टोबरला खाली घसरून ५.९० लाख मेट्रिक टनवर आला. ९ ऑक्टोबरला महानिर्मितीच्या खापरखेडा केंद्रात ३ दिवस, पारस केंद्रात ६ दिवस, चंद्रपूर केंद्रात १ दिवस, भुसावळ केंद्रात ५ दिवस, परळी केंद्रात २.५ दिवस, नाशिक केंद्रात ३.५ दिवस, कोराडी केंद्रात ८ दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक होता.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

“यंदाच्या पावसाळ्यात नेहमीच्या तुलनेत विजेची मागणी वाढल्याने जास्त कोळसा लागला. आता ऑक्टोबरमध्ये ही मागणी १० ऑक्टोबरला २८ हजार मेगावाॅटच्या वर होती. त्यामुळे महानिर्मितीने वीजनिर्मितीवर परिणाम होऊ नये म्हणून आधीच कोळशाची मागणीनुसार तरतुद केली आहे.” – राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.

महानिर्मिती प्रकल्पातील कोळशाची स्थिती

(चार्टमधील संख्या दिवसांची)

प्रकल्प १८ सप्टेंबर ९ ऑक्टोबर
भुसावळ ३.५ ५.०
नाशिक ४.५ ३.५
परळी ३.५ २.५
पारस २.० ६.०
खापरखेडा २.० ३.०
कोराडी ८.५ ८.०
चंद्रपूर ३.० १.०

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम