करोनामुळे आतापर्यंत २०६६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ११६१ रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिक : शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येत अकस्मात काहिशी वाढ झाल्याचे दिसत असून २४ तासात नवीन १४८ रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागात ४५ तर मालेगावमध्ये आठ रुग्ण आढळले. याच दिवशी १५० रुपये करोनामुक्त झाले.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एक लाख १७ हजार ५४७ पैकी एक लाख १४ हजार ३२० रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे.
करोनामुळे आतापर्यंत २०६६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ११६१ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील तीन, चार आठवडय़ापासून शहर, जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण कमी होत होते.
शहरात दैनंदिन १०० च्या आसपास रुग्ण आढळत होते. परंतु, गुरूवारी ही संख्या १४८ वर पोहचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दिवसभरात शहर, ग्रामीण असे मिळून एकूण २०६ नवे रुग्ण आढळले. यातील ४५ हे ग्रामीण भागातील तर आठ मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार नाशिक शहरात आतापर्यंत ७५ हजार ५४३, नाशिक ग्रामीणमध्ये ३३ हजार ३५३ आणि मालेगाव शहरात ४४३१ तसेच जिल्हा बाह्य ११६० रुग्ण बरे झाले. तर नाशिक शहरात १०२३, ग्रामीण ८१३, मालेगाव १७५ आणि जिल्ह्याबाहेरील ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात ३१, नाशिक महापालिका रुग्णालये, गृह विलगीकरणात ४९९, मविप्र वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात २४, मालेगाव महापालिका रुग्णालयात १६५ आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या करोना रुग्णालयात ४४२ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक ग्रामीणमध्ये ९६.३६ टक्के, नाशिक शहरात ९८.०३, मालेगाव ९३.०१ तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के आहे.