शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्रोत्सवास मंगळवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्रोत्सवास मंगळवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. नित्योपचार पूजा, धार्मिक विधी व रात्री देवीची छबिना मिरवणूक पार पडल्यानंतर दुसर्‍या माळेला बुधवारी तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा बांधण्यात आली होती. देवीच्या या रूपाचे दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

हे वाचले का?  Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

पौष शुक्ल पक्ष 9 नवमी शके 1946 बुधवार, 8 जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्रीचा दुसरा दिवस होता. या दिवशी श्रीतुळजाभवानी मातेची मातेची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली. या पूजेबाबत धार्मिक मान्यतेनुसार भगवान सूर्यनारायणांनी श्रीदेवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथअलंकार महापूजा मांडली जाते, असे संस्थानच्यावतीने सांगण्यात आले.

हे वाचले का?  PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

दरम्यान मंगळवारी पहिल्या दिवशी रात्री तुळजाभवानी देवीची प्रक्षाळ पूजा पार पडल्यानंतर वाघ वाहनावरून देवीची छबिना मिरवणूक पार पडली. दिवसभर भाविकांची देवीदर्शनासाठी मोठी गर्दी होती.