परिस्थितीची जाणीव न ठेवता काही शिक्षण संस्थांकडून सातत्याने शुल्कासाठी तगादा लावणे सुरु झाले आहे.
शिक्षण विभागाविषयी नाराजी
नाशिक : जिल्हा परिसरातील बहुतांश शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्याबरोबर पालकांच्या मागे शुल्क भरण्यासाठी संस्थांकडून तगादा सुरू झाला आहे. अशा संस्थांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रोर करूनही कोणतीही कार्यवाही के ली जात नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच आता नाशिक पालक संघटना आक्र मक झाली असून संघटनेच्या वतीने शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
मागील वर्षी टाळेबंदीमुळे शाळा ऑनलाइन सुरू होत्या. करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कित्येक पालकांचे अजून कामधंद्याचे काही खरे नाही. साठवलेला पैसा आजारपणात गेला आहे. असे असले तरी जमेल तसे मुलांचे शिक्षण करण्याचा प्रयत्न पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी शाळांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली. मात्र परिस्थितीची जाणीव न ठेवता काही शिक्षण संस्थांकडून सातत्याने शुल्कासाठी तगादा लावणे सुरु झाले आहे.
मनमानी पद्धतीने निष्टिद्धr(१५५)त केलेले शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांना व्हॉटस अप समुहातून काढणे, ऑनलाइन वर्गातून वगळणे, आयडी पासवर्ड न देणे, विद्यार्थ्यांंचे निकाल आणि दाखले अडविणे, शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणे, प्रवेशाकरिता अवाजवी शुल्क, इमारत निधी वसूल करणे, अशा अनेक मार्गांनी पालक आणि विद्यार्थ्यांंचा मानसिक छळ करून शैक्षणिक नुकसान केले गेले आणि आजही के ले जात आहेत. याविरोधात नाशिक पालक संघटनेने आवाज उठविणे सुरू के ले आहे. आर्थिक लाभासाठी शाळांकडून वारंवार शासनाचे कायदे पायदळी तुडविली जात असल्याचा आरोप संघटनेचे नीलेश साळुंके यांनी के ला.
शिक्षण विभागाला अशा नियमबा कारभार करणाऱ्या संस्थांवर ठोस कार्यवाही करण्यात रस नाही. संस्था संचालकांशी असलेले वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून शाळांना पाठीशी घातले जाते. शैक्षणिक संस्थांवर कार्यवाही करण्याचे आमच्याकडे अधिकार नसल्याचे पालकांना सांगून पालकांची दिशाभूल केली जात आहे. शासन नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. करोना काळातील एक वर्षांचा अनुभव पाहता शाळांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
शाळा संचालक आर्थिक नफ्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असून शिक्षण विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. कारवाई करण्यात कसूर करत आहे. या मनमानी कारभाराला आळा बसविण्यासाठी करोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रथम मुजोर शाळांना वाचविणाऱ्या शिक्षण विभागाचा आणि त्या शिक्षण संस्थांविरोधात आक्र मक धोरण ठरविण्यात येत असल्याचे नाशिक पालक संघटनेने नमूद के ले आहे.