शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेवर करोनाची टांगती तलवार

जूनच्या पहिल्या आठवडय़ात वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता

जूनच्या पहिल्या आठवडय़ात वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता

नाशिक : करोना महामारीमुळे वेगवेगळे क्षेत्र बाधित होत असताना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद राहिलेले नाही. करोना संसर्गामुळे सर्वाना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सोडत जाहीर होऊनही अद्याप प्रवेश प्रक्रि या सुरू होऊ शकलेली नाही. जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रवेश प्रक्रि येचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवेश प्रक्रि या रखडल्याने यंदाही सर्वाना शिक्षण हक्क अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाची मजा घेता येणार नाही, असेच चित्र आहे.

सर्वाना शिक्षण हक्क अर्थात आरटीई अंतर्गत राज्यस्तरावर प्रवेश प्रक्रि या सुरू आहे. नाशिक जिल्ह्य़ातील ४०० हून अधिक शाळा या प्रक्रि येत सहभागी झाल्याने आरटीई अंतर्गत चार हजार ५४४ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग खुला झाला. यासाठी १३ हजार ३२७ अर्ज प्राप्त झाले. अर्ज आणि जागा याचा विचार करता शिक्षण विभागाकडून सोडत जाहीर करण्यात आली.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

पुणे येथे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येऊन नाशिक जिल्ह्य़ातील चार हजार २८ विद्यार्थ्यांची निवड  झाली. दरम्यान, ऑनलाइन प्रवेश प्रक्रि येला सुरुवातीपासून ग्रहण लागले. ऑनलाइन अर्ज भरताना सुरुवातीला ओटीपीची तांत्रिक  अडचण आली. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रि या रखडली. प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आली होती. मात्र यातील काही दिवस ही प्रक्रि या सुरू झाली नसल्याने पालकांना अर्ज करता आले नाहीत.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

अखेर ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सोडतीत नाशिक जिल्ह्य़ातील पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी करोना

संसर्गामुळे ही प्रवेश प्रक्रि या रखडली आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवडय़ात राज्य शासनाच्या वतीने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिथिलतेनंतर प्रवेश प्रक्रि या सुरू झाली तरी ती रखडू शकते. पालकांना प्रवेश प्रक्रि येशी संबंधित कागदपत्र सादर करणे, त्या कागदपत्रांची तपासणी तसेच शाळांकडून हंगामी प्रवेश या सर्व प्रक्रि येला लागणारा वेळ पाहता बालकांचा शाळेचा ऑनलाइन का होईना पहिला दिवस हुकणार आहे.

हे वाचले का?  NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; ‘असा’ पाहता येणार निकाल!

नव्या शैक्षणिक वर्षांचा आरंभ १४ जून रोजी अपेक्षित असताना आरटीई प्रवेश प्रक्रि या पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्याच्या आनंदावर विरजण पाडणारा आहे.