आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित
नाशिक : आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, नाशिक तहसील कार्यालयाकडून शिधापत्रिका वितरणास सुरुवात झाल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे भगवान मधे यांनी दिली.
आदिवासी भागातील ज्या कु टूंबांकडे शिधापत्रिका नाही. किं वा विभक्त शिधापत्रिका मिळालेली नाही, अशा ८३ जणांची यादी नाशिक तहसील कार्यालयाकडे श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आली होती. सात महिन्यांचा कालावधी उलटूनही आदिवासींना शिधापत्रिका मिळाल्या नाहीत. आदिवासी
तसेच अन्य गरजु कु टूंबाना करोना काळात त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित रहावे लागत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.