शिवसेनेशी संघर्षांची भाजपची भूमिका अधोरेखित
राणे यांच्या मंत्रिपदाने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र येणार अशी हवा जोरात असतानाच, शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचा के ंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप आता शिवसेनेच्या विरोधात संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे अधोरेखित झाले. राजकीय वजन वाढल्याने राणे आता शिवसेनेशी दोन हात करण्यास मोकळे झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपने मराठा, आगरी, आदिवासी आणि वंजारी असा जातीजमाती आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न के ला आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा राजकीयदृटय़ा महत्वाचा संदेश समजला जातो. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू झाली होती. त्यातच शिवसेनेशी शत्रूत्व नाही तर वैचारिक मतभेद आहेत, असे विधान चारच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के ल्याने भाजप शिवसेनेला चुचकारत असल्याचे बोलले जाऊ लागले. फडणवीस यांच्या विधानानंतरच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक टाळण्यात आल्याने काँग्रेसच्या गोटातही चलबिचल सुरू झाली. मात्र, अधिवेशन संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपबरोबर युतीची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साफ आणि स्वच्छपणे
फे टाळून लावली. यापाठोपाठच राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे हे युती होणार नाही याचेच स्पष्ट संके त मानले जातात. फडणवीस यांचा के ंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर के ले जाईल या चर्चेलाही विस्तारातून विराम मिळाला.
राणे यांचा भाजपने के ंद्रीय मंत्रिमंडळात समावेश के ल्याने पुन्हा एकत्र येण्याचे दोर कापले गेल्याचेच लक्षण मानले जाते.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मोदी भेटीनंतर भाजपच्याच गोटातून पुन्हा एकत्र येण्याची चर्चा घडवून आणण्यात आल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते. त्यातून महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीत काहीसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजपरबरोबर पुन्हा युतीची शक्यता फे टाळून लावल्याने चित्र आता स्पष्ट झाले आहे. आगामी मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नारायण राणे यांचा शिवसेनेच्या विरोधात भाजपकडून वापर के ला जाईल हे स्पष्टच आहे.
पंकजा मुंडे यांना सूचक इशारा
विधानसभा निवडणुकीतील पराभवातंर विधान परिषदेवर पक्षाने संधी नाकारल्यावर नाके मुरडणाऱ्या व पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने सूचक इशारा दिला आहे. वंजारी समाजाच्या मतपेढीच्या आधारे स्वत: चे राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे पंख कापण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपने के ला आहे. वंजारी समाजातील डॉ. भागवत कराड यांना आधी राज्यसभेची खासदारकी व आता मंत्रिमंडळात समावेश, रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन पंकजा याच के वळ समाजाच्या नेत्या नाहीत हे भाजपने अधोरेखित के ले. पंकजा यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय सचिवपद सोपविण्यात आले असले तरी पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न सहन के ला जाणार नाही हाच संदेश त्यांना देण्यात आला आहे.
कोकणातील माणसाची नाळ शिवसेनेशी जोडली गेलेली आहे. सरडय़ासारखे कोणी रंग बदलले म्हणजे कोकणी माणूस आपला रंग बदलेल असे नव्हे तर तो शिवसेनेसोबतच कायम राहील. कोंडी कोणाची झाली होती म्हणून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला, कोंडी झाली म्हणूनच निवडणुकीत पराभव झाले का?
– अरविंद सावंत, मुख्य प्रवक्ते शिवसेना