शुल्क वसुलीविषयी तक्रार आल्यास शाळांची मान्यता रद्द

लवकरच राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होईल

शिक्षण उपसंचालकांचा इशारा

नाशिक : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काही शिक्षण मंडळांच्या शैक्षणिक वर्षास सुरुवातही झाली आहे. लवकरच राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होईल. या काळात शाळा प्रशासनाने शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नये आणि पालकांच्या यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिला आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

शालेय प्रशासनाच्या वतीने नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियमअंतर्गत पालकांना विश्वासात घेऊन शुल्क निश्चिात करण्यात यावे, शिक्षण शुल्काव्यतिरीक्त क्रीडांगण, स्नोहसंमेलन, वाचनालय, प्रयोगशाळा, अल्पोहार, बस आदींसाठी लागणाऱ्या शुल्कांची आकारणी करू नये, पूर्व प्राथमिक तसेच अन्य वर्गासाठी पालक तसेच विद्यार्थ्यांची तोंडी तसेच लेखी परीक्षा घेऊ नये, शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये, शैक्षणिक शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करू नये, आदी सूचना उपासनी यांनी के ल्या आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करणे तसेच संलग्नता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाच्या शिफारसीसह वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचा इशारा उपासनी यांनी दिला. दरम्यान, या शैक्षणिक वर्षात पालकांकडून सातत्याने शुल्क सक्तीविषयी आवाज उठविला जात असतांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कारवाईचे सोपस्कार पार पाडले गेले. परंतु, कु ठल्या शाळांवर काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात राहिले. नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभाग आक्र मक असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव