संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांची घेणार भेट

उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर संजय राऊत शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत मंगळवारी, दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर भेट घेण्यास जाणार असल्याचेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

“महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. अन्य एका ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की, किसान आंदोलन झिंदाबाद! will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..जय जवान, जय किसान!

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे. याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”