संत निवृत्तीनाथ पालखीचा प्रातिनिधीक प्रस्थान सोहळा

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान नियोजनाने वेग घेतला असून गुरूवारी संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या आवारात प्रातिनिधीक स्वरूपात वारीचा प्रस्थान सोहळा झाला.

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान नियोजनाने वेग घेतला असून गुरूवारी संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या आवारात प्रातिनिधीक स्वरूपात वारीचा प्रस्थान सोहळा झाला.

मागील वर्षी मानपान नाटय़, पुढाऱ्यांचा यामध्ये असणारा सहभाग यामुळे वारी चर्चेत राहिली. यंदा ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी वारीत वारकरीच केंद्रस्थानी राहील अशी भूमिका देवस्थानने घेतली आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

यावेळी विश्वस्तांच्या उपस्थितीत करोना विषयक नियमांचे पालन करत संत निवृत्तीनाथांच्या पादुका मंदिराच्या सभामंडपात आणल्या. यावेळी भजन, पूजा, आरती यासह अन्य धार्मिक कार्यक्र म झाले. मंदिराला यावेळी विणेकरींनी फे री मारली.

गर्दी टाळण्यासाठी यावेळी दिंडीतील मानकरी, विणेकरी यांनाच देवस्थानच्या आवारात प्रवेश देण्यात आला. पोलिसांनी या वेळी यादी प्रमाणेच मानकऱ्यांना प्रवेश दिला अन्य लोकांची गर्दी टाळली. यानिमित्ताने महिलांनी फु गडी घालत फे र धरला. विणेकरींनीही ताल धरला. महिनाभर भजन, कीर्तन होणार असून १९ जुलै रोजी  बसने वारी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल