सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तके मराठीत? मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देण्यास शिक्षण विभाग आग्रही

मातृभाषेतून शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला.

नागपूर : मातृभाषेतून शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्यामुळे आता सर्व विद्यापीठांमधील विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तके आता विद्यार्थ्यांना मराठीतदेखील उपलब्ध होतील.