सराफ बाजारात फेरीवाल्यांसह पथारीवाल्यांचेही अतिक्रमण

परिसरातील अडथळे दूर करण्याची संघटनेची मागणी

नाशिक : करोनाकाळात काटेकोर नियम पाळून प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य कारणाऱ्या शहरातील सराफ बाजाराला पुन्हा एकदा अवैध फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. सराफ बाजाराशी संबंधीत नसलेले फेरीवाले आणि रहदारीच्या रस्त्यातच पथारी मांडून विक्री करणाऱ्यांनी शासनाच्या करोना नियमावलीला केराची टोपली दाखवली. हा परिसर अतिक्रमणमुक्त आणि अवैध फे रीवाल्यांच्या त्रासातून मुक्त करावा, अशी मागणी दि नाशिक सराफ असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त कै लास जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

सराफ बाजार परिसरात अनावश्यक गर्दीमुळे सराफांकडे व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टाळेबंदीच्या काळात दहीपूल परिसरात रस्त्याची कामे सुरू असल्याने सराफ बाजारात व्यापारी तसेच ग्राहकांना रविवार कारंजाकडून बोहोरपट्टीमार्गे ये-जा करावी लागते. याच भागात रविवार कारंजा, बोहोरपट्टी ते सोन्यामारोती चौकातील रस्त्याचा फेरीवाल्यांनी ताबा घेतल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. मनपाकडून फे रीवालामुक्त  क्षेत्र धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास येथील अनावश्यक गर्दीवर नियंत्रण आणण्यास मोठी मदत होणार असल्याचे निवेदनात संघटनेने म्हटले आहे.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

सद्यस्थितीत उभारण्यात आलेल्या दुभाजकांमुळे  सराफ बाजारात ग्राहकांना येणे कठीण होत असल्याने सराफ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन महिने टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद होते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. आता कुठे स्थानिक प्रशासनाने अटी-शर्ती टाकून व्यवसाय सूरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, अतिरिक्त दुभाजक व अतिक्र मणाच्या समस्येमुळे  सराफांकडे ग्राहक येऊ शकत नसल्याने या समस्येबाबत महापालिकेने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.