‘सर्वांना शिक्षण हक्क’पासून जिल्ह्यातील हजारपेक्षा अधिक विद्यार्थी वंचित

करोनामुळे काही बालके  ही पालकांसोबत मूळ गावी परतली आहेत.

जिल्ह्यातील ४५० शाळांचा सहभाग,  ४ हजार ५४४ जागा उपलब्ध

नाशिक : करोनाचा संसर्ग लक्षात घेता रेंगाळलेली सर्वांना शिक्षण हक्क कायद्याची प्रवेश प्रक्रि या पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यात जिल्ह्यात एक हजार नऊ विद्यार्थी वंचित राहिले. तीन हजार १९९ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण के ली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी सर्वांना शिक्षण

हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के  प्रवेश निश्चिात करण्यात येतात. पैशांवाचून कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांना शिक्षण हक्क महत्त्वपूर्ण मानला जातो. या हक्कामुळे अनेक गरीब घरांमधील पालकांचे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आर्थिकदृष्ट्या गरीब असले तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असते, हे या हक्कामुळे दिसून येत आहे.

हे वाचले का?  Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

या हक्कातंर्गत आपल्या पाल्यास शालेय प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक प्रयत्नरत असतात. त्यांच्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायदा म्हणजे एक मदतीचा हात झाला आहे. करोना महामारीमुळे दोन वर्षांपासून या प्रक्रि येतंर्गत प्रवेशास अडथळे येत गेले. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी या योजनेत सहभाग घेतला असून या माध्यमातून चार हजार ५४४ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत चार हजार २०८ प्रवेश निश्चिात झाले.

करोना संसर्गामुळे ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू  होती. करोनामुळे काही बालके  ही पालकांसोबत मूळ गावी परतली आहेत. काहींना अजूनही कागदपत्रांची पूर्तता करता आलेली नाही. याशिवाय पालकांनी अर्ज भरताना चुकीची माहिती भरल्यामुळे काहींचे अर्ज

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

नाकारण्यात आले. परिणामी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ ही प्रक्रि या रखडली. या काळात शिक्षण विभागाच्या वतीने दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी आल्या.

राज्यस्तरावर या प्रक्रि येत नऊ हजार ४३२ शाळांनी सहभाग घेतला. या माध्यमातून ९६,६८४ जागा उपलब्ध झाल्या. पहिल्या सोडतीत ८२,१२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  यापैकी के वळ ५९,९९५ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश प्रक्रि या सुरू के ली. यापैकी के वळ तीन हजार १९९ विद्यार्थ्यांनी ही प्रक्रि या पूर्ण के ली. एक हजार नऊ विद्यार्थी या प्रक्रि येपासून वंचित राहिले.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!