सांगली : फेक न्यूज समाजमाध्यमात प्रसारित केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रविकांत पिंगळे या बनावट नावाने अज्ञात व्यक्तीने समाजमाध्यमामध्ये दीड लाखांच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार, पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न अशा मथळ्याची बातमी समाजमाध्यमातून प्रसारित केली होती.

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना समाजमाध्यमातून फेकन्यूज प्रसारित केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

रविकांत पिंगळे या बनावट नावाने अज्ञात व्यक्तीने समाजमाध्यमामध्ये दीड लाखांच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार, पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न अशा मथळ्याची बातमी समाजमाध्यमातून प्रसारित केली होती. पोलीस प्रशासनाकडून असा कोणताही अधिकृत अहवाल प्रसारित केला नसताना चुकीची माहिती देऊन लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने हे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अज्ञाताविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा