सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ!

पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी नैसर्गित वायूच्या दरांत वाढ केल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर १०२ रुपये १४ पैसे इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत हाच आकडा १०८ रुपये १९ पैसे प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचवेळी या दोन्ही राजधान्यांमध्ये डिझेल्या किंमती अनुक्रमे ९० रुपये ४७ पैसे आणि ९८ रुपये १६ पैसे इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये देखील पेट्रोलनं केव्हाच शंभरी गाठली आहे. आज कोलकात्यामध्ये पेट्रोल १०२ रुपये ७७ पैसे प्रतिलीटर तर डिझेल ९३ रुपये ५७ पैसे प्रतिलीटर दराने विकलं जात आहे. चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे ९९ रुपये ८० पैसे आणि ९५ रुपये ०२ पैसे प्रतिलीटर अस आहेत.

हे वाचले का?  Jharkhand : झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. राज्यांकडून लावल्या जाणाऱ्या करांमध्ये तफावत असल्यामुळे हे दर वेगवेगळे ठरतात. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती. शनिवारच्या आकडेवारीनुसार या किंमती ७८.६४ डॉलर प्रतीबॅरल इतक्या आहेत.

२४ तारखेपासून पुन्हा दर वाढू लागले

सप्टेंबर महिन्यात ५ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आंतरराष्ट्रीत बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्यामुळे अखेर रोज बदलणाऱ्या इंधन दरांची व्यवस्था भारतीय कंपन्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) या भारतीय तेल कंपन्यांनी रोज इंधनाचे सुधारीत दर देण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!