“सारा देश देख राहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी…”; सेनेच्या बंडखोरांविरोधात गुवाहाटीत NCP ची कट्टपा-बहुबली स्टाइल बॅनरबाजी

गुवहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’बाहेर लावण्यात आलेलं शिंदेंचं बॅनर हटवण्यात आलंय.

२२ जून पासून महाराष्ट्रातील राजकीय हलचालींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आसामच्या राजधानीमधील म्हणजेच गुवहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’बाहेर शिवसेनेचे बंडखोर आमदार विरुद्ध विरोधक अशी बॅनरबाजी सुरु झाली आहे. काल म्हणजेच २७ जून २०२२ रोजी या हॉटेलबाहेरील एका मोठ्या होर्डींगवर बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंसहीतचे होर्डींग झळत होते. मात्र आज हे हॉटेल असणाऱ्या राजधानीच्या शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नावाने फिल्मी स्टाइल बॅनर झळकावत बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आलीय.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘रेडिसन ब्लू’ हॉटेल ज्या परिसरामध्ये तिथेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनरबाजीमधून बंडखोर शिवसेना आमदारांना लक्ष्य केलंय. या हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाहुबली या गाजलेल्या चित्रपटामधील एका सीनमधील दृष्य दिसत आहे. कटप्पाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचं दृष्य पोस्टवर दिसत असून त्याच्या बाजूला गद्दार असा हॅशटॅग लिहिण्यात आलाय.

या बॅनर तळाशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं नाव आहे. तर पोस्टवर वरच्या भागामध्ये, “संपूर्ण देश पाहतोय, गुवाहाटीमध्ये लपलेल्या गद्दारांकडे. अशा खोट्या लोकांना जनता माफ करणार नाही,” अशा अर्थाच्या ओळी लिहिण्यात आल्यात. “सारा देश देख राहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को”, या ओळी या बॅनरवर आहेत.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

दरम्यान, कालच या हॉटेलसमोर शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ होर्डींग झळकावण्यात आले होते. मात्र हे होर्डींग आज काढून टाकण्यात आले आहेत.