सोलापुरात जानेवारीत राज्य पक्षिमित्र संमेलन

डॉ. मेतन फाउंडेशनने आयोजिलेल्या संमेलनासाठी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विभागाच्या सोलापूर कार्यालयांचे सहकार्य लाभणार आहे.

सोलापूर : सोलापुरात येत्या जानेवारी महिन्यात ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन भरणार आहे. या संमेलनात वनमहर्षी मारूती चित्तमपल्ली व बी. एस कुलकर्णी या दोन्ही ज्येष्ठ पक्षिमित्रांच्या सन्मानार्थ काही विशेष उपœ म राबविण्यात येणार आहेत.

डॉ. मेतन फाउंडेशनने आयोजिलेल्या संमेलनासाठी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विभागाच्या सोलापूर कार्यालयांचे सहकार्य लाभणार आहे. ‘माळरान-शिकार पक्षी आणि संवर्धन’ या संकल्पनेतून भरणाऱ्या या संमेलनाची माहिती डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यक्ती मेतन यांनी दिली. सोलापुरात ७, ८ व ९ जानेवारी २२ रोजी हे संमेलन आहे. एप्रिल महिन्यात हे संमेलन घेण्याचे नियोजन केले होते. सोलापूरचे ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. निनाद शहा यांची या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

सापमार गरुडाची निवड

या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून ‘सापमार गरुड’याची निवड करण्यात आली आहे. त्याचे अनावरण वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सापमार गरुडाच्या चित्राचा यामध्ये समावेश केला आहे. हा पक्षी सोलापूर जिल्ह्यातील माळरान व गवताळ प्रदेशावर आढळतो.