स्वामीनारायण मंदिर तीर्थयात्रींसाठी अध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र ; मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे

मंदिर सर्वांसाठी आकर्षणाचा, श्रध्देचा विषय असला तरी ते पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येईल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : बीएसपीएस स्वामीनारायण सांप्रदाय हा १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या सांप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे. स्वामीनारायण मंदिर नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि जगभरातून येथे येणाऱ्या तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व अध्यात्मिक आकर्षणाचे प्रमुख केंद्र झाले आहे. मंदिर सर्वांसाठी आकर्षणाचा, श्रध्देचा विषय असला तरी ते पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येईल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

येथील तपोवनातील केवडी वनात बाॅचासनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) वतीने उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना विधी समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वामीनारायण मंदिर म्हणजे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि जगभरातून येथे येणाऱ्या तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व अध्यात्मिक आकर्षणाचे प्रमुख केंद्र झाले आहे. हे मंदिर स्वामीनारायण यांच्या विचारातून साकारलेल्या कलाकृतींपैकी एक सुंदर नमुना आहे, अध्यात्मिक वास्तू, सेवा आणि त्यागाच्या विचारांतून समाजाला जोडण्याचे काम स्वामीनारायण सांप्रदायाच्या माध्यमातून जगभर केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
राज्यात अडीच महिन्यांपासून जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले असून ते जनतेची सेवा, विकासासाठी अहोरात्र कार्य करीत आहे. सेवा, विकासाचे ध्येय गाठण्यासाठी, लोकोपयोगी योजनांच्या आखणीसाठी, सुख-शांतीसाठी प्रसंगी स्वामीनारायण सांप्रदायाच्या आचार, विचार आणि कृतीची जोड सरकारच्या कार्याला दिली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

यावेळी महंत स्वामी महाराज यांनी देशात सुख-शांती कायम असेल तरच विकास साधला जाईल, असे सांगितले. देश पुढे जाण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भु्से, खा. हेमंत गोडसे, खा. राहुल शेवाळे यांसह सीमा हिरे, राहुल ढिकले, सुहास कांदे हे आमदार, संत कोठारी बाबा (भक्तिप्रियदास), विवेक सागर महाराज हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बी.ए.पी.एस. स्वामीनारायण संस्थेच्या वतीने स्वामी नीलकंठवर्णी महाराज यांची धातू प्रतिमा, पुस्तके देवून सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी केली.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

शिलान्यास ते मूर्तीप्रतिष्ठा हा तर आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराच्या शिलान्यास, भूमीपूजनासाठी ११ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्याचा एक मंत्री या नात्याने आपण उपस्थित होतो, असे सांगितले. आज याच मंदिराच्या मूर्तीप्रतिष्ठा विधीस मुख्यमंत्री म्हणून उपस्थित आहे. हे आपले भाग्य तर आहेच, तसेच अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण महाराज यांचा लाभलेला आशीर्वादही आहे. दोन वर्षे करोनाचे निर्बंध असतानाही अवघ्या तीन वर्षात हे मंदिर उभारून महाराष्ट्राला एक अनोखे मंदिरशिल्प दिल्याबद्दल त्यांनी स्वामीनारायण संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब