हनुमानाच्या जन्मस्थळावरून हमरीतुमरी ; नाशिकमधील शास्त्रार्थ सभेत महंत, मठाधिपतींचे रौद्ररूप

सर्व वादानंतर गोदाप्रेमी देवांग जानी आम्ही स्वामी गोविंदानंदांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे नमूद केले.

नाशिक :  हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंदा यावरुन निर्माण झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेत संत, महंतांमध्ये खडाजंगी झाली. महंतांनी माध्यम प्रतिनिधीचा ध्वनिक्षेपक उगारल्यानंतर किष्किंदा मठाधिपतींनीही रौद्रावतार धारण केल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करणे भाग पडले. कोणत्याही निर्णयाविना ही सभा स्थगित करण्यात आली.

) नाशिकरोड येथे आयोजित शास्त्रार्थ सभेत या विषयावर चर्चा करण्याचे ठरले. सभेच्या सुरूवातीला स्वामी गोविंदानंद यांच्याशी चर्चेसाठी महंत सुधीरदास, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, गोदाप्रेमी देवांग जानी, भक्तीचरण दास आदी उपस्थित होते. गोविंदानंद यांनी चर्चेसाठी सोफ्यावरुन खाली बसावे, असा आग्रह नाशिकच्या साधू, महंतांनी धरला. त्यामुळे वातावरण तापले. अखेर गोविंदानंद हे सोफ्यावरुन खाली बसल्यावर चर्चेला सुरुवात झाली.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

स्वामी गोिवदानंदांनी आपली माहिती देताना गुरु शंकराचार्याचा उल्लेख केल्यावर महंत सुधीरदास यांनी त्यांच्याकडे तर अनेक काँग्रेसी नेते जात असल्याचे नमूद केले. त्यावर स्वामींनी रौद्रावतार धारण करीत हा शंकराचार्याचा अपमान असल्याचे सांगितले. महंतांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. हा वाद वाढल्यावर महंत सुधीरदास यांनी गोिवदानंद यांच्यावर समोरच असलेल्या एका वृत्तवाहिनीचा ध्वनिक्षेपक उगारला. यावरून गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करणे भाग पडले. पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला केले. कोणताही निर्णय न होता शास्त्र सभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, या सर्व वादानंतर गोदाप्रेमी देवांग जानी आम्ही स्वामी गोविंदानंदांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

वाद कशावरून?

काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे आलेले कर्नाटकातील किष्किंदाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंदा असल्याचा दावा केल्यानंतर वादास तोंड फुटले. गोविंदानंदाचा दावा खोडून काढत अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ कसे आहे, हे त्यांना पटवून देण्यासाठी त्र्यंबकसह नाशिकचे साधू, महंत आणि गावकरी एक झाले.

दावे आणि प्रतिदावे..

नाशिक, त्र्यंबकच्या मंडळींनी पद्मपुराण, रामायण, ब्रह्मपुराण याचा आधार घेत हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी तर, वाल्मीकी रामायणचा आधार घेत किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थळ, असा दावा गोविंदानंदांकडून करण्यात आला. देवांग जानी यांनी सरकारी कागदपत्रांचा आधार घेत हनुमानाचा जन्म हा अंजनेरी येथेच झाल्याचे मांडले. किष्किंदातील कोणत्या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन