होळी, धुलीवंदनासाठी नियमावली जारी, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे नियम

गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी करोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे . या नियमावलीनुसार रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आलंय. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गृहखात्याने जारी केलेले नियम

>>> रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

>>> होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

>>> दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

>>> होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

>>> होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.

>>> कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

>>> धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल