१२वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा! पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबईत बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती.

मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचं वृत्त होतं. मात्र, रसायनशात्राचा पेपर फुटला नाही, या बातम्या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

विलेपार्लेमधील एका केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या फोनमध्ये १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आढळली होती. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर वाटप झाल्यानंतर आढळली आहे. हा प्रकार गंभीर आहे, मात्र पेपर फुटलेला नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.  

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!