“२०२०चा शेवट असा होईल वाटलं नव्हतं”; धर्मपाल गुलाटींच्या निधनाने नेटिझन्स हळहळले…

‘MDH मसाले’चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं गुरूवारी निधन

मसाल्यांचे बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं गुरूवारी निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे. त्यांच्या निधनाने सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे. पाहूया काही नेटिझन्सची भावनिक ट्विट…

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव