भुसावळ विभागातील १० स्थानकांवर प्रवाशांना नवीन नियम लागू

भुसावळ विभागातील १० स्थानकांवर प्रवाशांना नवीन नियम लागू
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 3 मिनिट )

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील १० स्थानकांवर नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवारी आणि शनिवारी संबंधित स्थानकांवर फलाट तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या सुविधेसाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चार ते आठ डिसेंबर या कालावधीत १५ अनारक्षित रेल्वेगाड्या चालवणार आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानही अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील १० स्थानकांवर नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवारी आणि शनिवारी संबंधित स्थानकांवर फलाट तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या सुविधेसाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चार ते आठ डिसेंबर या कालावधीत १५ अनारक्षित रेल्वेगाड्या चालवणार आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी),छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानही अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

See also  ‘सेमी हायस्पीड रेल्वे’ला समांतर मार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य!

या विशेष गाड्यांना उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, चाळीसगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, गर्दी व्यवस्थापनातही मदत होणार आहे.दरम्यान, मध्य रेल्वेच्या प्रशासनाने फलाटांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी फलाट तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी जाहीर केली आहे. ही बंदी पाच ते सात तारखेच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने लागू राहणार आहे.

भुसावळ विभागातील भुसावळसह नाशिकरोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर आणि चाळीसगाव या स्थानकांवरही पाच आणि सहा तारखेला फलाट तिकीट विक्री बंद राहणार आहे. वयोवृद्ध व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, मुले, निरक्षर व्यक्ती तसेच स्वतःची काळजी घेऊ न शकणाऱ्या महिला प्रवाशांसोबत असलेल्या व्यक्तींना फलाट तिकीट विक्रीच्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.