१५ जानेवारी मतदान, १६ जानेवारी निकाल

१५ जानेवारी मतदान, १६ जानेवारी निकाल
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 1 मिनिट )

मुंबईसह २९ महापालिकांच्याvनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर सोमवारी जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसह एकूण २,८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्व महापालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील पत्रकार परिषदेत केली.

See also  राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!