Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

अदाणींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरूच; आत्तापर्यंत एकूण ११८ बिलियन डॉलर्सचं नुकसान!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अदाणी उद्योग समूहाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. Hindenburg Research नं अदाणी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर अदाणी उद्योग समूहाची पत ढासळतानाच दिसत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदाणी उद्योग समूहाला एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा आकडा त्यांच्या एकूण संपत्ती मूल्याच्या जवळपास ५० टक्के इतका आहे!

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या १० कंपन्यांचे शेअर्स आधीच्या दोन दिवसांप्रमाणेच गटांगळ्या खाताना दिसले. त्यामुळे अदाणी उद्योग समूहाच्या एकूण नुकसानाचा आकडा आता ११८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आज अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स तब्बल २५ टक्क्यांनी खाली उतरले.

SBI नं अदाणींना दिलंय कोट्यवधींचं कर्ज!

दरम्यान, एकीकडे अदाणी उद्योग समूहाचे गुंतवणूकदार चिंतेत आलेले असताना दुसरीकडे त्यांना कोट्यवधींचं कर्ज देणाऱ्या एसबीआयचे खातेधारकही चिंतेत आले आहेत. अदाणी समूहाला आत्तापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियानं जवळपास २१ हजार कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यासंदर्भात चालू असलेल्या चर्चेवर बोलताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले, “अदाणी समूह आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. बँकेने दिलेल्या कर्जाबद्दल कोणतीही काळजी करण्याचं कारण आता दिसत नाही.”

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप