Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडिया द्वारे शिलाँग येथे ४ ऑक्टोबर २०२४ रोजी द फायनान्शियल एक्सप्रेस डॉट कॉम अॅडव्हेंचर टुरिझम मीट (ATM) २०२४ चं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये या क्षेत्रातील दिग्गज, सरकारी अधिकारी आणि साहसी पर्यटनाच्या चाहत्यांनी एकत्र येऊन विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून संवाद साधला.

फायनान्शियल एक्सप्रेस डॉट कॉम अॅडव्हेंचर टुरिझम मीट (ATM) २०२४ शिलाँग येथील स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ४ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते आणि यात भारतातील साहसी पर्यटनाच्या अफाट शक्यतांचा आढावा घेण्यात आला. ‘ATM 2024’ चे प्रेझेंटिंग पार्टनर ‘अतुल्य भारत’सह मेघालय टुरिझम होते. ओडिशा टुरिझम, उत्तराखंड टुरिझम, बोडोलँड टुरिझम आणि उत्तर प्रदेश टुरिझम हे गोल्ड पार्टनर होते.

उद्घाटन सत्र

कार्यक्रमाची सुरुवात “स्थानिक अर्थव्यवस्थांना साहसी पर्यटनाद्वारे पुनरुज्जीवित करणे या थीमवरील सत्राने झाली. अरुणाचल प्रदेशचे आमदार आणि राष्ट्रीय पर्यटन सल्लागार परिषद (NTAC), भारत सरकार व पर्यटन मंत्रालयाचे सदस्य ओकेन तायेंग, ओव्हरलँडर इंडियाचे संचालक अजित राणा, नॉर्थ ईस्ट इंडिया टुरिझम कॉन्फडरेशन (NEITC) चे अध्यक्ष ई. बानलमलांग ब्लाह आणि टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ मेघालय (TOAM) यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी साहसी पर्यटनाच्या क्षमतांवर चर्चा केली. असोसिएशन फॉर कन्झर्वेशन अँड टुरिझमचे कन्व्हेनर राज बासु यांनी या पॅनेलमधील चर्चेचे सूत्रसंचालन केले. पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती, स्थानिक व्यवसायांना समर्थन आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर चर्चेमध्ये भर दिला. साहसी पर्यटन कसे अद्वितीय आणि अस्सल अनुभवांची इच्छा असलेल्या पर्यटकांना आकर्षित करते आणि त्याच वेळी स्थानिक समुदायांचे आर्थिक उत्थान कसे करू शकते यावर चर्चेदरम्यान विशेष भर देण्यात आला.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी मुख्य अतिथी ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवाती परिडा आणि मेघालयचे पर्यटनमंत्री बाह पॉल लिंयांगदोह यांच्या हस्ते पारंपारिक दिवा प्रज्वलित करून झाले. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंधवानी यांच्या स्वागतपर भाषणाने समारंभाला सुरुवात झाली. मेघालय सरकारचे पर्यटन संचालक आणि मेघालय पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सायरिल व्ही. दारलोंग दियांगदोह यांनी स्वागतपर भाषण केले आणि सादरीकरण केले. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी विशेष व्हिडिओ संदेशामध्ये राज्याच्या विकासात साहसी पर्यटनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. बोडोलँड प्रादेशिक परिषद, आसामच्या पर्यटन विभागाचे कार्यकारी सदस्य डॉ. धर्म नारायण दास यांनी बोडोलँडच्या पर्यटन उपक्रमांवर विशेष भाषण दिले.

इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंधवानी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले, “गेल्यावर्षी येथे आपण जेव्हा एकत्र जमलो होतो, तेव्हा थीम होती ‘शाश्वतता’. यावर्षी, थीम आहे साहस. येथे या क्षेत्रातील अनेक दिग्गज आहेत आणि ही एक उत्तम सरुवात आहे.”मेघालय सरकारचे पर्यटन संचालक आणि मेघालय पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सायरिल व्ही. दारलाँग दियांगदोह यांनी आपल्या स्वागतपर भाषणात उपस्थितांचं स्वागत केलं. त्यात अनेक पर्यटन विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांना दियांगदोह यांनी ‘भविष्यातील उद्योजक’ म्हटले. “अॅडव्हेंचर टुरिझम मीटचे उद्दिष्ट या संपूर्ण प्रदेशाला पुढे नेण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण आणि सहकार्य करणे आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

मेघालयचे पर्यटन मंत्री बाह पॉल लियांगदोह यांनी आपल्या भाषणात एक प्रादेशिक दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे सांगितले. “आपल्या परस्पर अवलंबित्वामुळे आपण स्वतंत्र होऊ शकतो आणि एकत्रितपणे प्रगती करू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

मुख्य अतिथी ओडिशा सरकारच्या उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्री प्रवाती परिडा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भगवान जगन्नाथ यांना वंदन करून केली. त्यांनी मेघालयच्या मातृसत्ताक परंपरेची स्तुती केली. “ओडिशा सरकार खूप काळानंतर राज्यात साहसी पर्यटनाला चालना देत आहे. साहसी पर्यटन शिलाँग येथील या मीटमधून मिळालेल्या शिकवणीनुसार आम्ही ओडिशामध्ये साहसी पर्यटन विकसित करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

आपल्या विशेष भाषणात, आसाम पर्यटन विभागाच्या बोडोलँड प्रादेशिक परिषदेटे कार्यकारी सदस्य डॉ. धर्म नारायण दास यांनी बोडोलँडच्या पर्यटन आकर्षणांवर विशेष लक्ष केंद्रित केले. विशेषतः युनेस्को जागतिक वारसा स्थळ आणि जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या मानस राष्ट्रीय उद्यानावर त्यांनी भर दिला. “जग बदलत आहे आणि प्रवासी आता त्यांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक जागरूक होत आहेत. बोडोलँड आपलं नैसर्गिक सौंदर्य व अपरिचित क्षमतेसह प्रवाशांना एक अप्रतिम साहसी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

सत्रे आणि चर्चासत्रे

संपूर्ण दिवसभर चाललेल्या ATM 2024 मध्ये आघाडीच्या साहसी पर्यटन तज्ञांकडून अनेक चर्चासत्रे आणि सादरीकरणे झाली. ‘मेघालयातील अमर्यादित साहसी पर्यटन क्षमता’ या सत्रात साहसी पर्यटनातील आघाडीच्या व्यक्तींनी, ज्यात केव्हिंग अॅडव्हेंचर एक्स्पर्ट ब्रायन खारप्रन डॅली, पायोनियर अॅडव्हेंचर टूर्सचे सह-संस्थापक जेसन जर्मन लामारे, चेन रिअॅक्शन इंडियाचे संचालक शाहवार हुसेन आणि शिलाँग मोटरस्पोर्ट्सचे यूजीन नियांगती यांचा समावेश होता. मेघालयातील साहसी पर्यटनाच्या संधींबाबत या सर्वांनी त्यांचे विचार मांडले. हे सत्र इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडियाचे डेप्युटी असोसिएट एडिटर अॅरन परेरा यांनी सूत्रसंचालित केले. प्रत्येक पॅनेल सदस्याने साहसी पर्यटनाच्या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली. मेघालयला प्रमुख साहसी पर्यटन स्थळ म्हणून कसे ब्रँडिंग करता येईल यावर या सत्रात भर देण्यात आला.