आजी आजोबा दिन वक्तृत्व स्पर्धा – निकाल

बिलोरी तर्फे आयोजीत आजी आजोबा दिन वक्तृत्व स्पर्धेस भरघोस प्रतिसाद लाभला. जगभरातुन अनेक गुणी मराठी आणि इंग्रजी भाषा बोलणा-या स्पर्धकांनी आपले भाषणाचे विडीओ प्रवेशिकेच्या माध्यमातून पाठवले. या प्रतिसादाबद्दल आयोजक आपल्या सर्वांचे आभारी आहेत.

सर्व विडीओमधून केवळ काही विडीओ निवडणे ही अतिशय अवघड गोष्ट होती. मात्र, विषयांची निवड, आवाजाची गुणवत्ता, विडीओची गुणवत्ता,एकंदरीत भाषणामधून मांडले गेलेले मुद्दे यांचा परामर्श घेत परिक्षकांनी काही विडीओ निवडले आणि मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली.

सर्व स्तरातुन मतदानासाठी भरघोस प्रतिसाद लाभला. बिलोरी वेबसाईटवर प्रेक्षकांनी भाषणाचे विडीओ पाहून आपले मत दिले. त्याचप्रमाणे युट्युबवर विडीओ पाहून लाईक्स केले गेले तसेच प्रतिसाद दिले गेले. परिक्षकांनी सर्व विडीओ काळजी पूर्वक पाहिले आणि ऐकले. दिलेले विषय आणि अभिप्रेत असणारे भाषणातील मुद्दे यांचा सारासार विचार करुन तसेच स्पर्धकांची बोलण्याची शैली, भाषणात वापरण्यात आलेली शब्दसंपदा, हावभाव, आजी आजोबांबद्दल मांडलेले मुद्दे यांचा विचार करुन गुण दिले गेले आहेत.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

अशा प्रकारे सर्व गोष्टींचा विचार करुन अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात येत आहे.

प्रथम क्रमांक : जगंती पंकज देशपांडे
द्वितीय क्रमांक (विभागून) : श्रुतिका संदिप व्यवहारे आणि कैवल्य आनंद पोरे
तृतीय क्रमांक : चिन्मय किरण गरुड

उत्तेजनार्थ : वैष्णवी किरण फडके, सकीना अमीर सय्यद, आनंदी अमोल सवाई, वसुधा राजेश पाटील

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !!

महत्वाची सुचना : विजेत्या स्पर्धकांनी आपले पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक स्विकारण्यासाठी सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता बिलोरीच्या कार्यालयात यावे. बाहेरगावच्या स्पर्धकांनी श्री सतीष बोरा (९३७३९००४२५) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता – १६, बोरा बिल्डींग, बडोदा बॅंकेच्या वरती, रविवार कारंजा, नाशिक ४२२ ००१.

हे वाचले का?  नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान