अजित पवार यांनी सांगितली शपथविधीची तारीख, नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे. महायुतीला महाप्रचंड यश मिळालं आहे. दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हे अद्याप ठरायचं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्य़मंत्रिपदावरुन रेस असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोन दिवस एकनाथ शिंदेंनी बाळगलेलं सूचक मौन हेदेखील त्यामागचं एक कारण ठरलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं. तसंच मुख्यमंत्री म्हणून जे नाव जाहीर होईल त्याला पाठिंबा असेल असंही जाहीर केलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान अजित पवारांचं ( Ajit Pawar )महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जे नाव जाहीर केलं जाईल त्या नावाला शिवसेना म्हणून आमचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. तसंच कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख खूप मोठी आहे असंही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपाने आणि संघाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचं कळतं आहे. मात्र याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तर अजित पवार (Ajit Pawar ) यांनी थेट शपविधीची तारीख सांगितली आहे.
भाजपाच्या पत्रकार परिषदेत काय झालं?
एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनीही पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी महायुतीला साजेशी भूमिका घेतली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले. तसंच दिल्लीत आज (२८ नोव्हेंबर) महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्यानंतर नाव समोर येण्याची शक्यता असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी शपथविधी घेणार याची तारीखच सांगितली आहे.
अजित पवारांनी नेमकं काय सांगितलं?
महायुतीतले ( Mahayuti ) प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी माध्यमांना हे सांगितलं की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे
आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे शपथविधी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला शपथविधी होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.