Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माहीम विधानसभा निवडणुकासाठी अमित ठाकरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर ते दिलखुलास व्यक्त होत आहेत.
Amit Thackeray Latest News in Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं किंवा हे बंधू भविष्यात एकत्र येतील अशी सातत्याने अटकळ बांधली जाते. २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि शिवसेना व मनसे पक्षाची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, आजतागायत ही युती झालेली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक हे दोन्ही नेते एकत्र यावेत याकरता आशावादी असले तरीही त्यांच्या कुटुंबीयांची मात्र तशी अपेक्षा नाही, असं वारंवार समोर येतंय. आता मनसेचे माहीम येथील उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते साम मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माहीम विधानसभा निवडणुकासाठी अमित ठाकरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर ते दिलखुलास व्यक्त होत आहेत. २०१७ साली शिवसेनेने मनसेचे सात नगरसेवक फोडले होते. याबाबत माहिती सांगताना अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच, त्यांच्याकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्याला त्यांनी त्यांच्याकडून पूर्णविराम दिला.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मनसे – शिवसेना एकत्र येणार का?

अमित ठाकरे म्हणाले, “मी तेव्हा आजारी होतो. मी वडिलांकडे पाहत होतो, मला माहीत होतं की माझे वडील काय आहेत. या गोष्टींचा त्यांना फरक पडणार नाही हे मला माहीत होतं. ते पुढे काय करणार हेही मला माहीत होतं. पण त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) नैतिकता पाळली नाही. पण आता हे सांगतात की आजारी असताना ४० आमदार फोडले. मी आजारी असताना नगरसेवक फोडले, मग तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? आपण चुकीचं करतोय. वडील म्हणून मला संपूर्ण आत्मविश्वास आहे की ते काय करू शकतात. सात नगरसेवक गेले तर ते शंभर उभे करू शकतात. त्यांना वाईट वाटलं असणार पण आत्मविश्वास त्यांचा ढळला नसेल. तेव्हाच दोन भाऊ एकत्र यावेत, हा विचार माझ्यासाठी संपला. त्यामुळे मनसे-शिवसेने एकत्र येण्याची शक्यता आता माझ्याकडून तरी नाही.”