Assembly Election Results 2022 Live: पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपाच पुढे; गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची आघाडी

Assembly Election 2022 Results Live News Updates : गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स

Uttarakhand, Goa, Manipur, Punjab Assembly Election Live Updates: पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, विरोधकांची मागणी; पंतप्रधान काय म्हणाले?

Assembly Election 2022 Results Live News Updates : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल.SortLatestOldest11:14 (IST) 10 Mar 2022गोव्यात आम्हीच जिंकू – भाजपा नेते विश्वजित राणे

गोव्याची ही निवडणूक आम्हीच जिंकू. लोकांनी घोटाळेबाजांना, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. त्यांनी गोव्यातील जनतेसाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केले आहे, असं भाजपा नेते विश्वजित राणे म्हणाले. प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक
  • 10:39 (IST) 10 Mar 2022गोव्यात भाजपाची १८ आणि काँग्रेसची १२ जागांवर आघाडी

गोव्यातील सर्व ४० जागांसाठी अधिकृत कल समोर आले आहेत. त्यानुसार, भाजपा १८, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीममध्ये ३०० मतांनी आघाडीवर आहेत.