Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
Article Body Starting: Maharashtra Live News Updates, 21 August 2024: एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असतानाच बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून आता वातावरण ढवळून निघालं असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून या घटनेवर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
Marathi News Live Update, 21 August 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…
Badlapur School Case : ..मला दिलेली सुरक्षा सरकारनं काढून घ्यावी – सुप्रिया सुळे
माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी.. आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षितता दिला आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरच गरज नाही. मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलनं करणार. जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी – सुप्रिया सुळे</p>
पुणे : शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर: एरवी शहरात झालेल्या कोणत्याही राड्यात हक्काने कार्यकर्त्यांसाठी पोलीस ठाण्याची पायरी झिजवणारे नेते आदर्श शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणावर शांत होते. त्यात इतका गंभीर प्रकार झालेला असतानाही स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घेतलेले आढेवेढे आणि शाळा प्रशासनाने बाळगलेले मौन या कारणांमुळे बदलापुरात नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन पेटले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याची २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.