CBSC 2021 : सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

जाणून घ्या कधी होणार आहेत या परीक्षा?

सीबीएससी बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा १० जूनपर्यंत चालतील. १५ जुलैपर्यंत निकाल लागेल असंही त्यांनी सांगितलं. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की सीबीएससीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा ते ३१ डिसेंबरला करतील. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

परीक्षेच्या तारखा समजल्याने सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन या तारखांची घोषणा केली आहे. याआधी जेव्हा जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरुन संवाद साधला तेव्हा असे वाटले होते की ते परीक्षेच्या तारखा जाहीर करतील. मात्र त्यांनी आज तारखा जाहीर केल्या आहेत.

रमेश पोखरियाल यांनी पहिल्यांदा लाइव्ह सेशन घेतलं होतं तेव्हा त्यांनी जेईई परीक्षेच्या तारखांना मंजुरी दिली. त्यानंतर शेवटच्या वेबिनारच्या वेळी ते मोठी घोषणा करतील असं वाटलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर त्यांनी याबाबतची घोषणा ३१ डिसेंबरला करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता आज त्यांनी या परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन