CBSE Term 1 Result 2022 : सीबीएसई बोर्डाने जाहीर केला दहावीच्या परीक्षेचा निकाल

जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येणार निकाल ; पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात होत आहे

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावीच्या प्रथम टर्मच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावेळी बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्याऐवजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल आणि स्कोअरकार्ड मेल केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळेत CBSE इयत्ता दहावी टर्म 1चा निकाल पाहू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाकडून अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर देखील निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

बोर्डाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये पहिली टर्म परीक्षा घेतली होती. असं पहिल्यांदाच होत आहे की बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेतली जात आहे. अधिकृत माहितीनुसार, CBSE दहावी टर्म 2 परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल आणि २४ मे २०२२ रोजी संपेल, तर बारावी टर्म 2 च्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होतील आणि १५ जून २०२२ रोजी संपतील. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!