Chandrayaan 3 च्या निर्णायक प्रवासाला सुरुवात, चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?

Chandrayaan 3 mission : मध्यरात्री चांद्रयानचे इंजिन काही मिनिटे प्रज्वलीत करण्यात आले आणि यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदली

ISRO Mission Update : चांद्रयान ३ हे १४ जुलैला प्रक्षेपित करण्यात आले होते. गेले काही दिवस यान हे पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी पृथ्वीपासूनचे अंतर वाढवत होते. आज मध्यरात्री २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ यानाचे इंजिन प्रज्वलीत करण्यात आले. यामुळे यानाचा वेग वाढत तो सुमारे १० किलोमीटर प्रति सेंकद एवढा झाला आणि यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदण्यात यशस्वी झाल्याचं इस्रोने जाहिर केलं आहे.

हे वाचले का?  Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना

चांद्रयान ३ मोहिमेच्या महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस चांद्रयान ३ चा प्रवास चंद्राचा दिशेने सुरु राहील. पाच ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा यानावरील इंजिन प्रज्वलीत केले जाईल आणि यानाला चंद्राच्या कक्षेत आणले जाईल.

त्यानंतर पुढील काही दिवस यानाची चंद्राभोवती लंबवुर्तळाकार कक्षा कमी करत यानाला १०० किलोमीटच्या कक्षेत आणलं जाईल. त्यानंतर चंद्रावरील उतरण्याची जागा निश्चित केल्यावर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.