Corona: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख चीनवर नाराज; म्हणाले…

चीनमधूधनच करोनाचा फैलाव झाल्याचे दावे

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिनिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

चीनमधील वुहान येथे करोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर याची चाचपणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. “चीनमधील अधिकाऱ्यांनी अद्यापही अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी गरज असणाऱ्या सर्व परवानग्या घेतल्या नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,” असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी चीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून हे मिशन जागतिक आरोग्य संघटनेची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं आहे”. प्राण्यांच्या आजारावरील तज्ज्ञ पीटर यांच्या नेतृत्वात ही टीम काम करणार आहे. जुलै महिन्यात पीटर चीनममध्ये प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी गेले होते.

दुसरीकडे चीन करोनाची नेमकी कुठून आणि कशी सुरुवात झाली याची माहिती गोळा करत आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून करोनाचा प्रसार होणारी ठिकाणं वेगवेगळी असल्याचं समोर येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.चीनवर वारंवार करोनाला योग्य प्रकारे हाताळलं नसल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील चीनवर जाहीरपणे करोनाचा फैलाव केल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेल्या अमेरिकेने पारदर्शकपणे संपूर्ण तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित